No menu items!
Tuesday, December 3, 2024

धार्मिक कार्यक्रमावरील निर्बंध हटवा -श्री राम सेना बेळगाव

Must read

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र देवस्थान मठ मंदिर त्या ठिकाणी अद्यापही निर्बंध लादण्यात आल्याने ते मागे घेण्यात यावेत या मागणीचे निवेदन श्रीराम सेना बेळगाव यांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

सरकार लग्न समारंभ हॉटेल पब रेस्टॉरंट याठिकाणी निर्बंध शिथिल करते. मात्र मंदिरासारखे पवित्र असलेल्या ठिकाणी निर्बंध लादते त्यामुळे या धार्मिक कार्यक्रमातील निर्बंध काढून टाकावेत आणि जत्रा महोत्सव यात्रा करण्यासाठी अनुमती द्यावी अशी मागणीचे निवेदन श्रीराम सेना बेळगाव च्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे .

देवस्थान मठ मंदिरांमध्ये निर्बंध लादण्यात आल्याने तसेच काही मंदिरे देखील बंद केल्याने मंदिराच्या बाहेर असणाऱ्या शेतकरी व्यापारीवर्ग फळ फूल विक्रेते तसेच इतर साहित्य विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे धार्मिक स्थळांवर निर्बंध हटवावे अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले आहे .याप्रसंगी श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर जिल्हा कार्याध्यक्ष विनय अंगरोळी यांच्यासह श्री राम सेना बेळगाव चे कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!