पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना पेटेबसवन्ना ता. सौंदत्ती जि. बेळगाव येथे घडली. सिद्धारूढ मंजुनाथ गंगी (वय 8) असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धारूढ हा आज सकाळी आजोबांसोबत पोहायला शिकण्यासाठी गेला होता. यावेळी पाठीवर प्लास्टिकचा डबा घेऊन तो पाण्यात उतरला. विहिरीत पोहताना कॅन काढल्याने तो पाण्यात बुडाला. सिद्धारूढच्या मृत्यूची बातमी समजतात कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाची मुरगोड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.