बेळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्ताने ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने विविध मान्यवर वक्त्यांचे ‘हिंदू राष्ट्र’ या विषयावर छत्रे वाडा, अनसुरकर गल्ली, बेळगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 28/09/2022 या दिवशी दुपारी 04 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी हिंदु धर्मप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर येथील जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.
‘हिंदु राष्ट्र या विषयावर‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. रमेश शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी 20 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 31 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता,‘हिंदु धर्माची महानता,‘शौर्य जागरणाची आवश्यकता, ‘लव्ह जिहाद,‘हलाल जिहाद’आदि विविध विषयांवरील व्याख्याने,‘हिंदु राष्ट्र परिसंवाद, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी, मंदिर आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम,‘हिंदु राष्ट्र संघटन मेळावे, ‘पथनाट्य’, अधिवक्ता बैठका आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 9845837423 या क्रमांकावर संपर्क करावा.
आपला नम्र,
श्री. सुधीर हेरेकर
हिंदु जनजागृती समिती, जिल्हा बेळगाव,
(संपर्क : 9845837423