नवरात्रोत्सवात शिवसैनिक धारकरी यांच्यासह दौड मध्ये सर्वात आधी खाकी यंत्रणा धावताना दिसते. सर्व मार्गाची पाहणी करत खाकी पुढे पुढे जात असते. तसेच या खाकीच्या मागून ऑटोरिक्षा देखील शिवगर्जना करत पुढे मार्गस्थ होत असते.
मात्र या दौडीमध्ये आज एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला चक्क वरिष्ठ दर्जाचे अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण बरमनी यांनी ऑटो रिक्षा चालवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आज वडगाव भागात दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसीपी नारायण बरमनी हे रिक्षा चालवत असतानाचे दृश्य अनेकांना कुतूहलाचा विषय म्हणत होते.तसेच त्यांनी चालवलेल्या या ऑटो रिक्षेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.