तू दुर्गा, तू काली,तू पार्वती,तू अन्नपूर्णा अशा विविध रूपातील स्त्रीशक्ती दररोज आपल्या अवतीभवती नांदत असते.त्या स्त्रीमध्ये असलेल्या कलेला वाव देण्याबरोबरच स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी मिडटाउन तर्फे भव्य अशा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. देवीच्या रूपांचा अविष्कार आणि महिमा स्त्रीशक्तीने आपल्या रांगोळी कलेतून साकारला. आणि दांडिया गरबा फेस्ट अधिकच रंगमय बनला.
रोटरी तर्फे आयोजित दांडिया गरबा फेस्ट 2022 चा चौथा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला 25 हून अधिक स्पर्धकांच्या सहभागातून रांगोळी स्पर्धा चांगलीच रंगली. सामाजिक उपक्रम समोर ठेवत मी डेटावून तर्फे दररोज विविध स्पर्धा पार पडत आहेत.या स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभत असून यामुळे फेस्ट अधिकच उत्साही वातावरणात सूरू आहे.
सायंकाळी सुरू असणारा दांडिया गरबा कार्यक्रमाला तरुणाईचा उत्साह मोठा असून यामध्ये सहभागी होण्यासाठी गटागटाणे आणि संघासंगाने तरुणाई प्रतिसाद दर्शवत आहे. त्यांच्या कलेला अधिक वाव देण्यासाठी म्हणूनच दांडिया प्रवेश शुल्काची रक्कम कमी करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे.
यामुळे इच्छुक संघाने तसेच गटाने अथवा वैयक्तिक रित्या सहभागी होण्यासाठी सायंकाळी सात वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी डान्स स्पर्धा होणार असून सदर स्पर्धेसाठी देखील स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी केली आहे.