उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी एक सुधारणा आदेश जारी केला आहे .ज्यामुळे आता गोवा आणि बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाटावर रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे .
मात्र या मार्गावरून पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहनांना या मार्गाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे .
येथील मार्गावरून ये जा करताना प्रवासी वाहनांना धोका निर्माण झाला होता त्यामुळे हि बाब लक्षात ठेवत याआधी आठ दिवसांपूर्वी, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती .
तसेच गोवा सीमेवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहने रोखल्याने केरी चेकपोस्टवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, दुसरा कोणताही सोयीचा मार्ग नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे आदेश जारी केले आहेत.
सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे अनमोड घाट मार्ग जड वाहतुकीसाठी बंद आहे, त्यामुळे बेळगावहून काणकोण मार्गे जाताना वाहनांना 160 किलोमीटरचे जादा अंतर कापावे लागत आहे.