सामाजिक उपक्रमात नेहमीच आघाडीवर असलेल्या वेदांत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या धडपडीमुळे ग्रामीण भागातील चौघां जणांची मोफत मोतीबिंदू नेत्र चिकित्सा पार पडली. यासाठी आर्थिक हातभार लागला तो वेदांत फौंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक आणि रोटेरियन अशोक नाईक यांचा.
बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी येथील मारुती नलवडे , श्रीमती गंगुबाई पाटील, खानापूर तालुक्यातील बिडी- गोल्याळी येथील श्रीमती रामाक्का सातन्नावर व महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील तुडये येथील लक्ष्मी हुलजी यांना मोतीबिंदूची समस्या होती . परिस्थिती थोडी बिकटच. ही माहिती वेदांत फौंडेशनला उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी या चौघांच्या मोफत मोतीबिंदू नेत्रचिकित्सेसाठी धडपड चालविली. त्यांनी ही बाब वेदांत फौंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक आणि रोटेरियन अशोक नाईक यांना सांगितली.
यावेळी अशोक नाईक यांनी पुढाकार घेऊन त्या चौघांचा मोतीबिंदू चिकित्सेचा खर्च उचलला आणि यातून त्या चौघांचे “डॉक्टर कोडकिनी” हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले.
यासाठी वेदांत फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील , उपाध्यक्ष सुनिल देसूरकर, फाऊंडेशनचे संचालक आणि कणबर्गी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश अष्टगी, विश्वनाथ पाटील , चिंतामणराव हायस्कूल चे युवराज रत्नाकर , सातेरी चौगुले , सुरज पाटील , रवि हरगुडे , सविता चंदगडकर, आस्मा नाईक , जयश्री पाटील, शैलजा बी . यांनी विशेष परिश्रम घेतले.
मोफत मोतीबिंदू ऑपरेशन झालेल्या त्या चौघांनी, शिक्षक व समाजसेवकांच्या वेदांत फौंडेशन या सेवाभावी संस्थेचे आणि यासाठी आर्थिक हातभार लावणारे वेदांतचे प्रमुख मार्गदर्शक रोटेरियन अशोक नाईक यांचे या मदतीबद्दल आभार मानले आहेत.