बेळगाव येथील हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धिक स्पर्धांमध्ये पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाने पदवी पूर्व गटात दैदिप्यमान यश मिळविले आहे.
हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ यश प्राप्त केले आहे. पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरती गोरल हिचे वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि प्रियांका सावकार हिला निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ गौरविण्यात आले आहे. विजेत्यांचे फिरता चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ममता पवार विश्वभारत सेवा समितीचे सचिव श्रीमान प्रकाश नंदिहळ्ळी व हिंदी विषयाचे व्याख्याते सुरज हतलगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.