हिंडलगा येथील उद्योजक रवी उर्फ बंटी सरप यांचेकडून कोलिक येथील मराठी विद्या मंदिर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
राजवीर सरप याच्या दहाव्या वाढदिनी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलिक ग्रामपंचायतचे सरपंच संभाजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन रमाकांत वाय.पावशे, हिंडलगा महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर उपस्थित होते. प्रथम अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलित
करण्यात आले.
विद्यार्थीनींच्या ईशगीत व स्वागत गीतानंतर मुख्याध्यापक ए. डी. पाटील यांचे प्रास्ताविक मनोगत केले. सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी सलग बारा वर्षे शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देणारे रवी सरप यांचा शाल श्रीफळव पुष्पगुच्छ देऊन सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी
प्रकाश बेळगुंदकर व संभाजी गावडे यांची शाळेच्या विकासाच्या दृष्टीने समयोचित भाषणे केली.यानंतर शैक्षणिक साहित्य वितरण सर्वांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला उपसरपंच अनिल गावडे, शाळा विकास व्यवस्थापन समितीचे सदस्य गोविंद गावडे, रघुनाथ गावडे, पुंडलिक नाईक व
सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन. पाटील व आभार आर. पी. सुतार यानी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.