“वेळेला महत्व द्या.वेळेचे भान ठेवा. विद्यार्थी जीवनात अनेक भाषा शिकून त्या त्या भाषेवर प्रभुत्व मिळवा.मोबाईलचा अतिरेक उपयोग टाळा”.असे आवाहन डाॅ अनुपमा जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. मराठा बॅंकेच्या सभागृहात मर्कंटाईल सोसायटीच्या वतीने आयोजित कौतुकसंध्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष संजय मोरे हे होते तर व्यासपीठावर सोसायटीचे उपाध्यक्ष रमेश ओझा, संचालिका शारदा सावंत उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. संजय मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. डाॅ अनुपमा जोशी यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर लक्ष्मी फोटो पूजन शारदा सावंत यांनी केले.संजय मोरे यांनी श्रीफळ वाढविले. डाॅ अनुपमा जोशी यांना शाल ,श्रीफळ, भेट वस्तू देवून शारदा सावंत यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना डाॅ अनुपमा जोशी पुढे म्हणाल्या की, परिक्षेला जसे वेळेवर जाता तसे जीवनातील प्रत्येक क्षणाला महत्व दिला तरच तुम्हाला यश मिळेल. प्रत्येकांनी गाडी चालवताना हेल्मेट वापरा आणि धोका टाळा. लहान मुलांच्या हातात गाडी देवू नका असे भावनिक आवाहनही त्यांनी उपस्थित पालकांना केले. यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले की “कौतुकसंध्या, स्वरसंध्या, आरोग्य तपासणी शिबीर असे अनेक उपक्रम सोसायटीच्या माध्यमातून राबवत असतो.तसेच सोसायटीच्या पाच शाखा असून 9800 इतके सभासद आहेत. 58 कोटीच्या ठेवी असून 48 कोटी इतके कर्ज वितरण केले आहे.वार्षिक उलाढाल 240 कोटी असून 20 कोटी गुंतवणूक आहे तर खेळते भांडवल कोटी इतके आहे.असे ते म्हणाले.
यावेळी राणी चन्नम्मा विद्यापिठात मराठी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केलेली तेजस्विनी कांबळे, बी.एड परिक्षेत सुवर्ण पदक प्राप्त केलेली नेत्रा कांबळे, अथलेट्स मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या श्रुष्टि पाटील,शहरात पिंक आटो चालविणारी एकमेव महिला प्रभा बिशरोटी तसेच शिला केरलेकर हिचे आईवडील नसताना सुध्दा तिची आजी सुशिला पाटील (होनगा) यांनी तिचे शिक्षण पूर्ण केले.या सर्वांच्या विशेष कर्तुत्वाबद्दल डाॅ अनुपमा जोशी यांच्या हस्ते मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत मुलांचा दहावी ,पीयुसी, पदवीधर परिक्षेत विशेष गुण मिळविल्याबद्दल रोख रक्कम, पारितोषिक व मानचिन्ह देवून गौरविन्यात आले. यावेळी सर्व संचालक, व्यवस्थापक, सभासद, पालक विद्यार्थी हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे पुंडलीक कुंडेकर यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थेचे उपाध्यक्ष रमेश ओझा यांनी आभार मानले