बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भेट देत येथील आजी-आजोबांशी संवाद साधून त्यांचा आशीर्वाद घेतला.
प्रारंभी त्यांचे शांताई मध्ये जंगी स्वागत करण्यात आले यावेळी शांताईचे ॲलन मोरे व संतोष ममदापूर यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर रवी साळुंखे यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताई वृद्धाश्रम ने केलेल्या उत्तम आदरातिथ्याबद्दल आश्रमाचे आभार मानले. याप्रसंगी मारिया मोरे चेरील मोरे वसंत बालीगा प्रसन्न घोडगे यांच्यासह आश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.