महाद्वार रोड परिसरातील स्पेअर पार्टच्या दुकानाच्या गोदामाला आग लागल्याने स्पेअर पार्ट दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
येथील महाद्वार रोड कॅनरा बँक जवळ येईल ऑटोमोबाईल या ऑटो स्पेअर पार्ट दुकानाच्या गोदामाला काल दुपारी अचानक आग लागल्याने दुकानातील महागडे ऑटो पार्ट जळून खाक झाले आहेत.
यावेळी दुकानाला आग लागली तेव्हा आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली.