अलतगा येथील खडीमशीन जवळ एक युवक कॉरीमध्ये बुडाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर युवक पाण्यात बुडाला असल्याने त्याची शोध मोहीम हाती घेण्यात आले असून या ठिकाणी पोलीस प्रशासन अग्निशमन दल त्याचा शोध घेत आहेत.
सदर युवक अनगोळ येथील असून त्याचे नाव सतीश हणमणांवर असे आहे ते त्याच्या मित्रांकडून समजले आहे. तसेच त्यांना शोधण्याकरिता अथक प्रयत्न करण्यात येत आहेत.