लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच सर्व महिलांना एकत्रित आणून कार्तिक दीपोत्सव साजरा करून आनंदोत्सव करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता गल्लीतील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी पूर्ण गल्लीमध्ये भव्य रांगोळ्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते.
आनंदवाडी येथील महादेव मंदिर आणि बसवांना मंदिर या ठिकाणी कार्तिक आणि दीप लावून पूजन व आरती करण्यात आली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना सर्व महिलांनी दीप ओवाळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला.
यावेळी नवदुर्गा ग्रुपच्या सर्व महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.कार्यक्रमाकरिता गल्लीतील बऱ्याच नागरिकांनी देणगी देऊन सहकार्य केले. त्याकरिता लेडी लायन्स ग्रुपच्या संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले.
या कार्यक्रमाकरिता माधवी सुतार, राजश्री सावंत, वासंती पाटील, कांचन गवि, कल्पना भांदुर्गे, यल्लू गवी, वर्षा गवी, पूजा मुचंडी, श्रद्धा पाटील,रूपाली सरनोबत, पार्वती नाईक, सुरेखा काक्तीकर, विना भोसले, रूपा धोंगडी, तेजू पाटील, पूजा काकतीकर, सुजाता पाटील, रसिका पाटील,विद्या कंणबरकर, राजश्री गंगणे तसेच गल्लीतील सर्व महिलांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम पार पाडला.