बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विजेता रोहन कोकणे याचा मराठा युवक संघा तर्फे स्केटिंग क्षेत्रात असामान्य कामगिरी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी रोहन चा सत्कार माननिय किरण ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी बेळगांव मधील खेळाडूंना अधिक अधिक उंच कामगिरी करून बेळगाव चे नाव जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवावे असा संदेश दिला .
हा कार्यक्रम 30 ऑक्टोबर 2022 रोजी बेळगाव येथे मराठा युवक संघ स्केटिंग स्पर्धा 2022 च्या भव्य कार्यक्रमात घेण्यात आला यावेळी या मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, उमेश कलघटगी, सचिव चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी,दिनकर घोरफोडे, शिवाजी हांगिरर्गेकर,अप्पासाहेब गुरव, कन्नूभाई ठक्कर, रमेश हन्नेकेरी, अजित कोकणे, शिवाजी हांडे,नारायण किडवाडकर,श्रीकांत देसाई,नेताजी जाधव,शेखर हंडे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, गणेश दड्डीकर स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते.