स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बेळगावमध्ये पथदीप व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 37 हजार एलईडी दिवे लवकरात लवकर बसवावेत अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी घेतलेल्या विकास आढावा बैठकीत केली
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी (ता. 31) स्मार्ट सिटीचे अधिकारी व इतरांची बैठक घेऊन स्मार्ट सिटीसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी त्यांनी एलईडी दिवे बसवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे सांगून येत्या पाच आठवड्यांत सर्व ३७ हजार एलईडी दिवे बसविण्यात यावेत, असे निर्देश दिले.
‘अधिवेशन जवळ येत असताना रस्ते, स्मार्ट सिटी आणि महापालिकेची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत’, असे ते म्हणाले.
स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत आधीच पथदिव्याचे खांब लावण्यात आले आहेत, लवकरच त्या खांबांना एलईडी दिवे लावले जातील आणि बेळगावात प्रकाशाचा झगमगाट होईल अशी माहिती दिली .