वाडमय चर्चा मंडळातर्फे रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात रंगभूमी दिनानिमित्त वाङ्मय चर्चा मंडळ येथे मंडळाचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्वा सैनिक विठ्ठलराव याळगी यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.सदर कार्यक्रम रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमात स्वाती कुलकर्णी दिग्दर्शित ऋतूंचे रूपरंग व नीता कुलकर्णी दिग्दर्शित नाट्य चतुरंग असा कार्यक्रम होणार आहे प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका आशा रतनजी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम कै रुस्तम रतनजी यांच्या स्मृतीला अर्पण केला असून तो सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.