खुल्लम खुल्ला अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुरुष नाही तर एका अधिकारी महिलेने लाज मागितल्याचे या व्हिडिओ मधून स्पष्ट होत आहे.
विजापूर जिल्ह्याच्या एक्ससाइज इन्स्पेक्टर ज्योती मेत्री यांनी जून आणि जुलै महिन्याची हप्त्याची थकबाकी द्यावी असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे तसेच त्यांनी बार मालकांना प्रत्येक बार साठी पंधरा हजार रुपये हप्ता देण्यास सांगितले आहे.
या व्हिडिओतील संभाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहे यामध्ये सदर महिलेने तुम्ही डीसी ला देता जेसी ला देता मग आम्हाला का देत नाही असा प्रश्न विचारला असून हप्ता दिला तर ठीक नाहीतर तुमचे खरे नाही अशी धमकी दिल्याचे संभाषणामधून स्पष्ट होते आहे. त्यामुळे सरकार या अधिकारी महिलेवर कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.