महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे गतवर्षी प्रमाणे शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी सरकारी प्राथमिक मराठी शाळा सोनोली येथे संपन्न झाला ह्यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती चे शैक्षणिक व सांस्कृतिक प्रमुख सिद्धार्थ चौगुले यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली, व मातृभाषेतून शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगितले, समितीचे नेते व गावचे पंच शिवाजी कडोलकर यांनी युवा समितीच्या ह्या कार्याने सीमाभागात मराठी शाळांना एक वेगळं वलय निर्माण झालाय आणि त्यांनी हे कार्य पुढं चालू ठेवावे असे सांगून कौतुक केले. यावेळी गावातील समिती चे निष्ठावंत शिवाजी कडोलकर, अनिल झंगरूचे, रमेश झंगरूचे, सागर झंगरूचे, परशराम झंगरूचे, एसडीएमसी अध्यक्ष यल्लाप्पा झंगरूचे, जोतिबा कित्तुरकर, राजू झंगरूचे, अशोक कडोलकर, जयवंत झंगरूचे आदी उपस्थित होते, मुख्याध्यापिका कुलकर्णी टीचर यांनी सूत्रसंचालन केले.
सरकारी प्राथमिक मराठी शाळा यळेबैल येथे गतवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले ह्यावेळी सिद्धार्थ चौगुले यांनी उपक्रमाची माहिती देऊन मनोगत मांडले, शाळेचे मुख्याध्यापक श्री कनगुटकर सर यांनी युवा समितीचे आभार मानून मराठी माध्यमाचे महत्व विद्यार्थांना समजावून सांगितले, यावेळी कार्यक्रमाला सागर झंगरूचे, जोतिबा कित्तूरकर, शाळेचे शिक्षक बेटेगेरी सर उपस्थित होते, श्री कांबळे सरांनी आभारी मानले.