मॉडर्न जिम तर्फॅ फिटनेस चॅलेंजस्पर्धा आयोजित करण्यात आली होती .यामध्ये 60 स्पर्धकांनी भाग घेतला होता.अध्यक्षस्थानी मॉडर्न जिमचे संचालक किरण कावळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास किल्लेकर ,संजय पुजार,ओंमकार कंग्राळकर. इफ्तिहार माडीवाले ,प्रशिक्षक किर्तेश कावळे यांची उपस्थिती लाभली .
यावेळी आयोजित केलेल्या स्पर्धेत यश संपादित केलेल्या स्पर्धकांना पाहुण्यांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि बक्षीस देण्यात आले.याप्रसंगी स्क्वॅट मध्ये {squat]
प्रथम क्रमांक भीम सुरते,द्वितीय क्रमांक विशाल इंगोली तृतीय क्रमांक सचिन पाटील यांनी पटकाविला.
तर पुश अपमध्ये [ push up] नदीम मिर्झा अमॄत कांगले अरबाज खान यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय क्रमांक मिळविला .त्यासोबतच
पुल अपॅसमध्ये अरबाज खान ,आ॓मकार कंग्राळकर वाशीम बेपारी यांनी बक्षिसे मिळविली .
तसेच स्क्वाट जंप मध्ये अमृत कांगले रोहन कारेकर नदीम मिर्झा यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविला .तर जम्पिंग जॅक मध्ये राहुल कडोलकर रोहण कारेकर दुगाराम प्रजापत
प्रॅन्क मध्ये भीम सुरते नदीम मिर्झा Bवाशीम बेपारी यांनी प्रथम द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले .याप्रसंगी जिमचे कोच कितीॅश कावळे यांनी आभार मानले.