No menu items!
Tuesday, October 22, 2024

उचगावातील फुटबॉल स्पर्धेत फास्ट फॉरवर्ड विजेता

Must read

येथील क्रीडांगणावर उचगाव फुटबॉल क्लबतर्फे झालेल्या स्पर्धेत फास्ट फॉरवर्ड संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांना २२,००० रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातील ३२ फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता.

रविवारी (ता. २७) अंतिम सामना किंग ब्रदर्स व फास्ट फॉरवर्ड यांच्यात झाला. यात फास्ट फॉरवर्डने दोन गोल करुन विजय प्राप्त केला. उपविजेत्या किग ब्रदर्स यांनी ११,००० रुपये रोख व चषक देण्यात आला. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार होते.

एल. डी. चौगुले, बळवंत पावशे, बाळकृष्ण तेरशे, उमेश शिंदोळकर, महेश देसाई, गजानन बांदिवडेकर, पवन देसाई, सुरेश चौगुले, शशिकांत जाधव, विनायक मेलगे, राकेश बांदिवडेकर उपस्थित होते.

फुटबॉल क्लबचे अध्यक्ष प्रणाम राणे, विनायक चौगुले यांनी स्वागत केले. पंच कौशिक पाटील यांचा सत्कार केला. निवृत्त मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी आभार मानले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!