दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे नुकताच इयत्ता नववी व दहावी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेण्यात आला. शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री नारायण पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून सरकारी प्रायमरी शाळा मुचंडी येथील शिक्षक श्री विजय मगदूम आणि सरकारी प्रायमरी शाळा बेनकनहळ्ळी येथील शिक्षक श्री ईश्वर पाटील हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ लताताई पावशे, श्री कल्लाप्पा देसुरकर, श्री राजू देसुरकर, श्री बुधाजी पाटील उपस्थितहोते.कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पी आर पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात केले. यानंतर प्रमुख पाहुण्याचे व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दहाच्या वर्गशिक्षिका श्रीमती एस एम पाटील यांनी इयत्ता दहावीचा निकाल वाढवण्यासाठी शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. नववीच्या वर्गशिक्षिका श्रीमती एल एल पी झांगरूचे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची कर्तव्य व जबाबदारी सांगून मार्गदर्शन केले.
शारीरिक शिक्षण श्री आर एन पाटील पाटील यांनी मुलांच्या आरोग्यासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती देऊन शाळेतील उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी पालकांना प्रोत्साहन मार्गदर्शन केले . प्रमुख वक्ते विजय मगदूम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व सांगून इंग्रजी विषयावर व्याकरणाची वेगवेगळी उदाहरणे देऊन कॉलेजच्या जीवनात इंग्रजीचा वापर कसा होतो यावर सखोल मार्गदर्शन केले. श्री ईश्वर पाटील यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची कर्तव्ये सांगून मार्गदर्शन केले.त्यानंतर लताताई पावशे यांनी मागील वर्षीचा दहावी निकाल 100% लागल्याबद्दल विद्यार्थ्यांची व शिक्षकांचे अभिनंदन केले. व या वर्षी सुद्धा दहावीचा निकाल उत्तम लागण्यासाठीविद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पालक प्रतिनिधी श्री राजू देशकर व बुधाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर श्री जी आय गुंजटकर आणि एस बी दानणावर यांनी विद्यार्थी व पालक यांचा संवाद घडवून आणला. शेवटी अध्यक्षीय भाषणात नारायण पाटील यांनी पालकांना, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उद्देशून मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर ए परब तर आभार प्रदर्शन आर ए पाटील यांनी केले. या पालक मेळाव्याला सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.