गुणवत्तेच्या जोरावर जिंकली
५०० डॉलर्स किंमतीची ४ रोख बक्षिसे
बेळगाव / प्रतिनिधी
यूएस स्थित एनजीओ शूटिंग स्टार्स फाउंडेशनतर्फे शनिवार दि.१० डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या २४ तासांच्या हॅकाथॉनमध्ये भरतेश महाविद्यालयातील बीसीसीएच्या विद्यार्थिनींनी गुणवत्तेच्या जोरावर यश प्राप्त करत
५०० डॉलर्स किंमतीची ४ रोख बक्षिसे जिंकली. यामध्ये दोन प्रथम आणि दोन द्वितीय क्रमांक आहेत.
या मेगा ऑनलाईन कार्यक्रमात भरतेश बीसीसीए महाविद्यालयाच्या १३५ विद्यार्थिनींच्या संघासह
यूएस, थायलंड, तुर्की, जॉर्डन, ग्रीस पाकिस्तान, इजिप्त या देशातील २०० संघ सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेसाठी भरतेश बीसीसीएच्या 27 संघांनी नोंदणी केली होती. यावेळी वेब डिझाईनिंग, ॲप डेव्हलपमेंट, डिकॉर्ड आणि डेव्हपोस्ट यासारख्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सादर करण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा तिगडी यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांना नितीन खानापूरकर, श्रेणिक पाटील, विद्या अनदानवर, रसिका पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने यशस्वी विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी भरतेश संघांनी 500$ किमतीची 4 रोख बक्षिसे जिंकली, त्यापैकी दोन प्रथम आणि दोन द्वितीय क्रमांक आहेत .या ऑनलाइन स्पर्धेत भरतेशच्या 27 संघांनी नोंदणी केली. यावेळी वेब डिझायनिंग, अॅप डेव्हलपमेंट, डिसॉर्ड आणि डेव्हपोस्ट यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले एक्सपोजर मिळाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा तिगडी मार्गदर्शक नितीन खानापूरकर, श्रेणिक पाटील, विद्या अनदानवर आणि रसिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.