हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण बेळगावचे आमदार श्री अभय पाटील आणि उत्तर बेळगावचे आमदार अनिल बेनके यांना देण्यात आले. दोघांनीही हा विषय आपण येत्या अधिवेशनात घेऊ असे सांगितले.
या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे हृषिकेश गुर्जर, भारत पाटील, मारुती सुतार,सविता गणेशन, सनातन संस्थेच्या नम्रता कुट्रे, श्रीमती कंग्राळकर आणि जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या अर्चना पाटील, सुमंगला कणेरी आदी उपस्थित होते.