शेतकऱ्यांची गुरे लंम्पि स्किन मुळे मरत आहेत ही चिंतेची बाब आहे त्यामुळे आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची जनावरे लंम्पिस्किन या रोगामुळे मुळे मरण पावली त्यांना नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.
त्यांनी पहिल्या टप्प्यात 99 जनावर मालकांना नुकसान भरपाई दिली आहे.खानापूर तालुक्यात आतापर्यंत 173 गुरे मृत झाल्याची नोंद झाली आहे.निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, जनावरे मालकांची मृत गुरांना नुकसानभरपाईचे आदेश जारी केले आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी गुरांना एक वर्षाच्या आतील जनावरांना 5,000 रुपये, गायींना 20,000 रुपये आणि बैलांसाठी 30,000 रुपये निश्चित करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले .