कर्नाटक सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावा दरवर्षी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते मात्र या महामेळाव्याला कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी आणि केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 26 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे.
आज मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने हा निर्णय घेतला असून 26 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता शहरातील एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देऊन दुचाकीने सर्वजण कोल्हापूर येथे रवाना होणार आहेत. आणि या ठिकाणी धरणे आंदोलन धरून कर्नाटक प्रशासनाने केलेल्या दडपशाहीचा निषेध महाराष्ट्रात करणार आहेत