मराठा मंडळ शिवराज हायस्कूल राकसकोप मध्ये 2003 ते 2004 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एम पी पाटील सर हे होते त्यानी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अवचित साधून ज्या गुरुने भविष्यातील प्रगतीची वाट दाखवली व ज्ञानाचे धडे शिकवले असे श्री सी एम पाटील सर व हाडगुडे सर व इतर शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने साल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
त्याचबरोबर माजी विद्यार्थी मधून श्री नाथाजी मरगाळे सर यांचा साल व श्रीफळ देऊन माजी विद्यार्थी व शिक्षकाकडून गौरव करण्यात आला यावेळी गुरूने भूतकाळात घडलेल्या आठवणी ताज्या केल्या व माजी विद्यार्थी याने त्या वेळेचे अनुभव व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एम शिंदे सर यांनी केले व आभार श्री आर बी इंगळे सरांनी केले यावेळी सोमनाथ मोरे सोमनाथ सुखये रमेश मरगळे लक्ष्मण शहापूरकर गावडू शहापूरकर चंद्रकांत बेळवटकर मयुरी पाटील सुनिता पाटील शोभा शहापूरकर सुजाता केसरकर संतोष मोटर संदीप बळवटकर गुणवंत मोटर भाऊ पाटील किरण मोटर गजानन कडोलकर सरिता पाटील माधुरी वैशाली नीता आदी उपस्थित होते.