बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज आरएलएस कॉलेज मागे असलेल्या सिटी पोलिस लाइन्स येथे केले.
कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ बेळगाव विभागातर्फे २ एकर जागेत १७ कोटी रुपये खर्चून हे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
या इमारतीची पायाभरणी 01 डिसेंबर 2020 रोजी स्वतः बसवराज बोम्मई यांनी राज्याचे गृहमंत्री असताना केली होती.आणि आज त्यांच्याच हस्ते नव्या कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले
सध्याचे पोलिस आयुक्त कार्यालय हे एसपी ऑफिस रोड येथील जुन्या इमारतीत असून लवकरच ते आरएलएस कॉलेजच्या पाठीमागील नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहे.