No menu items!
Thursday, August 28, 2025

कौशल्यपूर्ण अध्यापन करणे अत्यंत गरजेचे : आ. अरुण शहापूर

Must read

शिक्षणातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी नव्या शिक्षण नीतीचा अभ्यास करून कार्य करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता शिक्षकांनी पुढाकार घेऊन वाटचाल करायला हवी. शिक्षण हे माणसाच्या जीवनात परिपूर्णत्वाकडे नेणारी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे; श्वासाच्या अंतापर्यंत शिक्षण माणसाला मदत करते याचे भान ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवनात कौशल्यपूर्ण अध्यापन करण्याची जबाबदारी पेलणे आवश्यक आहे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी अथक प्रयत्न राहणे आज काळाची गरज बनली आहे. कारण बदलत जाणारा काळ आणि त्यामध्ये आपण टिकण्यासाठी परिपक्व होणे खूप गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य तो वापर करून जगभरातील ज्ञान आत्मसात करायला प्रयत्न करणे गरजेचे असून नको त्या वाईट सवयीना बाजूला ठेवले तर जीवनाचे नंदनवन व्हायला अधिक वेळ लागणार नाही. शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणून देशाचे उज्वल भविष्य निर्मितीसाठी शिक्षकाने पुढे पावले टाकायला हवीत तरच देशाच्या बळकटीला बळ मिळेल. कोणतेही ध्येय आपल्या समोर ठेवले असता ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य होऊ शकते.bअथक परिश्रम मेहनत जिद्द चिकाटी प्रामाणिक प्रयत्न कार्यात असणारा सातत्यपणा ठेवून ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही; शक्य होऊ शकतेच याचे भान विद्यार्थ्यांच्या मनामनात बिंबवण्याची गरज आहे. भारतातील पी. टी. उषा सारख्या ऑलिम्पिक धावपटूच्या जगभरातील कामगिरीमुळे त्यांची निवड जगभरातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये बिनविरोध करण्यात आली याचे श्रेय म्हणजे अथक परिश्रम घेऊन केलेली कामगिरी कधीच वाया जात नाही हेच विचार हेच ध्येय आजच्या पिढीने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.असे प्रतिपादन माजी विधान परिषद चे सदस्य आमदार श्री अरुण शहापूर यांनी केले.

कर्नाटक राज्य शारीरिक शिक्षक संघ बेंगलोर 2022 -2023 राज्यस्तरीय एक दिवशीय मार्गदर्शनपर शिबिर आणि व्याख्यान, सर्व सदस्य वार्षिक बैठक महासभा, जिल्हा कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया
मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी बेळगाव येथील बि.के. मॉडेल हायस्कूलच्या मास्टर धर्माजी अंनगोळकर सभागृहात नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य शारीरिक शिक्षक संघटना बेंगलोरचे अध्यक्ष श्री. एस. चवडप्पा होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागतगीत व ईशस्तवन बीके मॉडेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.

एक दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे उद्घाटन सभापती श्री बसवराज होरट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

भारत मातेचे फोटो पूजन शिक्षणमंत्री श्री. बी.सी. नागेश व माजी विधान परिषद सदस्य श्री अरुण शहापूर यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व्यासपीठावरील विधान परिषद सदस्य पुटन्ना, हनमंत निराणी, अहमद अदेवेगौडा, डॉ. वाय. एन. नारायणस्वामी, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री आर. पी. वंटगुडी, प्रा. निलेश शिंदे, शिक्षणाधिकारी बी. एम. नलतवाड, रवी बजंत्री, मुख्याध्यापिका शैलजा ए चाटे, उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. बी सोसायटीचे सचिव श्रीनिवास शिवनगी व अरविंद हुनगुंद यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सभापती बसवराज होरटी, शिक्षण मंत्री बी.सी. नागेश, माजी विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांनी राज्यभरातील आलेल्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शनपर भाषणे केली.

याप्रसंगी कर्नाटक राज्य शारीरिक शिक्षक संघ बेंगलोर यांच्या नूतन कार्य करणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. आर. पी. वंटगुडी यांची राज्य कार्यकारणी मध्ये बिनविरोध सर्वानुमते करण्यात आले त्यावेळी हात उंचावून टाळी वाजून अनुमोदन देण्यात आले.

स्वागत उमेश कुलकर्णी, प्रास्ताविक कर्नाटक राज्य शारीरिक शिक्षक संघ बेंगलोरचे अध्यक्ष श्री. एस. चवडप्पा यांनी केले. परिचय जिल्हा कार्यादर्शी एल. एन. कुरेर व एम.पी. निचनकी यांनी करून दिला. सूत्रसंचालन मंजू देगानट्टी व वामन कुलकर्णी यांनी केले तर प्रा. एन. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी पी. सी जोशी, एस.एन. जोशी, एन. ओ. डोणकरी, मंजू गोल्हीहळी, सरिता कावळे, राजाराम कुडतुरकर, नारायण पाटील उदय पाटील, चंद्रकांत पाटील, नागराज भगवंतनावर, हनुमंत रोगी, रमेश मांग, संजीव बडगेर, एम. आर. आमाशी, एन. बी. पाटील, रामलिंग परीट यासह कर्नाटक राज्यातील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापक कमिटीचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!