No menu items!
Wednesday, August 27, 2025

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा चव्हाण यांना महात्मा कबीर समता परिषदेचा महाराष्ट्रभुषण व जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Must read

महात्मा कबीर समता परिषदेचा महाराष्ट्र भुषण व जीवनगौरव पुरस्कार दिनांक 25 डिसेंबर रोज रविवार रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगांव तर्फे सत्कार करण्यात आला.

प्रा.वर्षा चव्हाण माॅडम यांच्या सामाजिक सेवा जसे स्वच्छता व वृक्षारोपण अभियान व गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अविरतपणे करत असलेली सेवा व कायापालट अभियानांतर्गत बेघर व निराधारांची मोफत कंटिंग व दाढीची सेवा, तसेच अनेक शाळेत राबविण्यात आलेले तंबाखुमुक्त अभियान व महिलांचे कौशल्य विकसित करण्यासाठी संस्थेकडुन राबविलेले मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण यासह इतर अनेक सामाजिक कार्याचा
तसेच शैक्षणिक कार्यात अनेक आय.टी.आय. व इंजिनिअरींगचया विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांंचे जिवनात उल्लेखनीय बदल घडवून स्वताच्या पायावर उभे केले. आज अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे कंपनी मध्ये कार्य करीत आहेत.

या सर्व सामाजिक व शैक्षणिक सेवेचा विचार करून महात्मा कबीर समता परिषदे कडुन महाराष्ट्रभुषण व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बलदेवसिंह चव्हाण – कुलगुरू मुंबई हिंदी विद्यापीठ, उदघाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नारायण पाटील सांगली हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मनिषभाऊ कावळे, बसपा महाराष्ट्र प्रभारी, समाजसेविका जयश्री जयस्वाल, गोदातीर समाचार चे संपादक पंढरीनाथ बोकारे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा.वर्षा चव्हाण माॅडम यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेतल्याबद्दल महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदराज पाटील व त्यांच्या संपूर्ण सहकार्याचे आभार मानले. तसेच लवकुश जाधव यांचेही विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदराज पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सहकारी उत्तम काशिंदे यांनी केले. सभागृहात प्रचंड संख्येने जनसमुदाय आणि पुरस्कार प्राप्त परिवाराची प्रामुख्याने उपस्थिती होती.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!