बेळगावातील महिलांकरिता पिंक बस सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बीजेपी मोर्चा सचिव सौरभ सावंत यांनी परिवहन आणि समाज कल्याण मंत्री बी श्री राम लू यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच त्यांनी सदर निवेदन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना पाठविले आहे.
बेळगावचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे बेळगाव शहरात महिला प्रवाशांकरिता पिंक बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की कर्नाटक राज्यातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या शहरांमध्ये बेळगाव हे एक आहे.
तसेच बेळगाव ला बहुभाषिक शहर म्हणून देखील ओळखले जाते.त्याची सीमा महाराष्ट्र आणि गोवा राज्याला लागून आहे तसेच शहराची लोकसंख्या जवळपास आठ लाख च्या आसपास आहे.
त्याबरोबरच अनेक नागरिक कामाकरिता तसेच शिक्षणासाठी बेळगाव मध्ये येत असतात.
या ठिकाणी अनेक शाळा उद्योग महाविद्यालय रोजगार वसाहती आहेत त्यामुळे बेळगावात रोज रहदारी वाढत आहे. त्यामुळे बेळगाव मध्ये महिलांकरिता पिंक बसची व्यवस्था करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन त्यांनी परिवहन आणि समाज कल्याण मंत्री श्री रामलु यांना दिले आहे. तसेच ही सेवा लवकरात लवकर बेळगाव मध्ये सुरू करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.