अलीकडेच नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या मुख्य इमारतीवर, फलाटावर आणि बसेसवर मराठी भाषेत फलक लावले गेले नाही
बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिक हे बहुभाषिक असून त्यांना कानडी समजत नाही, परिवहन मंडळाने भाषे संदर्भात राजकारण न करता बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर इंग्लिश, कानडी सोबत मराठी मध्ये देखील फलक लावावेत अशा मागणीचे निवेदन म.ए.युवा समिती तर्फे बेळगावच्या परिवहन मंडळाला देण्यात आले होते.
पण परिवहन मंडळाने मराठीला डावलून, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्यवर्ती बस स्थानकाचे उदघाटन गेल्या आठवड्यात २७ डिसेंबर रोजी पार पडले. मराठीला डावलल्याने मराठी भाषिकांमध्ये प्रशासन विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
मराठी भाषेत फलक न लावल्याने परराज्यातून आलेल्या प्रवाशांना बस, फलाट शोधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत सेवा द्या असा उच्च न्यायालयाने निकाल दिला होता, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने देखील मराठीच्या संदर्भात वेळोवेळी सूचना केल्या आहेत. कोल्हापुर येथे राज्यपालांची बैठक झाली त्यात देखील मराठी भाषिकांच्या घटनात्मक हक्क संदर्भात महाराष्ट्राचं राज्याने लक्ष वेधले होते, तरी देखील बेळगावचे प्रशासन जाणूनबुजून मराठी भाषिकांच्या हक्कासंदर्भात गळचेपी करीत आहे.
बेळगावच्या परिवहन मंडळाला मराठीचा वापर करण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत या साठी म.ए.युवा समितीने केंद्रिय अल्पसंख्याक मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीची एक प्रत दिल्ली व चेन्नई येथील भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयाला देखील पाठवण्यात आले आहे
“परिवहन मंडळाला” मराठी फलक लावण्याचे निर्देश द्या, युवा समिती कडून केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्याकडे तक्रार दाखल.
