कसाई गल्लीत येथे एका घराला आग लागून मोठ्या नुकसान झाले आहे.आग गॅस गळतीने लागली असल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सदर घटना काल सायंकाळी साडेसात वाजता घडली असून या घटनेत विनायक बारटक्के यांच्या घरातील कपडे लते, फ्रिज धान्य जळाले आहे.
विनायक हे भाडोत्री घरात राहत होते त्यांचे घर कौलारू असल्याने आग लागल्याने संपूर्ण छत जळाले आहे मात्र घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातून पलायन केल्याने जीवितहानी टळली आहे
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी टक्के कर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली