बेळगाव महापौर पदी सामान्य महिला आणि उपमहापौरपदी मागासवर्गीय महिला यांची लवकरच वर्णी लागणार आहे. याबाबत नगर विकास खाते व शहविकासचिवयाने कर्नाटक राज्य पत्राद्वारे राज्यातील बेळगाव सह अन्य राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर केले आहे.बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची आरक्षण यानुसार बेळगाव महापौर पदी सामान्य महिला जी डब्ल्यू आणि उपमहापौर पद मागासवर्गीय महिला ब श्रेणी असे आरक्षित आहेत.
त्याचप्रमाणे राज्यातील अन्य महानगरपालिकांची आरक्षण सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार बेल्लारी जी डब्ल्यू जी, बेंगलोर एसटी डब्ल्यू एस सी,दावणगिरी जी बी एस डब्ल्यू, हुबळी, धारवाड जी जी डब्ल्यू म्हैसूर जी डब्ल्यू बीसीए, शिमोगा एस सी डब्ल्यू जी,तुमकुर एससी डब्ल्यू एस सी डब्ल्यू विजयपूर जी -एस टी असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.