गुलमोहर बागतर्फे दि. २२ जानेवारी रोजी प्रयास हे चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये बेळगावचे चित्रकार सहभागी होणार आहेत. दि. २२ ते २६ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत वरेरकर नाट्य संघातील के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन होईल. या दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता पेंटिंगचे प्रात्यक्षिक होईल. दि. २३ रोजी शिवाजी बेकवाडकर, २४ रोजी अंजली पवार, २५ रोजी स्नेहा कंग्राळकर व २६ रोजी सचिन उपाध्ये यांचे प्रात्यक्षिक होईल. दि. २२ रोजी सकाळी १०.३० वाजता चित्रकार शरद तरडे, जयंत हुबळी व पार्श्वनाथ नांद्रे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे
गुलमोहर बागतर्फे २२ रोजी ‘प्रयास’ चित्रप्रदर्शन
By Akshata Naik

Must read
Previous articleशनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम
Next articleजायंट्स इंटरनॅशनल संघटनेची जागतिक परिषद आजपासून