बेळगाव : खडक गल्ली येथील श्री ट्रेकर्स – श्री युवक मंडळाच्या माध्यमातून शिवप्रेमी गडभ्रमंतीसाठी रवाना झाले आहेत. या मोहिमेत गड स्वच्छता मोहीम राबविली जाणार असून या मोहिमेची सुरुवात शहर उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके लोकमान्य टिळक गणेश महामंडळ अध्यक्ष विजय जाधव,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, यांच्या हस्ते करण्यात आली. सदर गडभ्रमंतीत किल्ले अलंग-मलंग-कुलंग, कळसूबाई शिखर, रतनगड नाणेघाट व किल्ले जीवधन आदी ठिकाणांचा समावेश आहे.यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खडक गल्ली येथील श्री ट्रेकर्स-श्री युवक मंडळ गडभ्रमंतीसाठी रवाना
By Akshata Naik
Previous articleदैवज्ञ ब्राह्मण समाजाचा तिळगुळ समारंभ रविवारी



