वंटमुरी कॉलनी येथे सरकार कन्नड उच्च प्राथमिक शाळा नंबर 33 मध्ये बूट सॉक्स वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आज बेळगाव उत्तर चे लाडके आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बूट सॉक्स वितरण करण्यात आले. सरकारच्या अनुदानातून विद्यार्थाना या गोष्टीचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष दत्ता बिलावर, सदस्य उपाध्यक्ष जोती कुमार, बलराम मासेनट्टी, नगरसेवक लक्ष्मी महादेव राठोड, मुख्याध्यापक एस टी कोलकर, गोपी लमानी, वकिल शाहूराज उपस्थित होते.