श्री तुळजाभवानी सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगाव यांच्या वतीने नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी कार्यक्रम छ श्री शिवाजी महाराज उद्यान बेळगाव येथे आयोजित करण्यात आला होता सुरवातीला प्रेरणामंत्र म्हणून शिवरायांच्या मुर्तीचे व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्री मंगेश पवार, श्री राजु भातकांडे, श्री जयंत जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीला अभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर तानाजी मालुसरेंचा प्रसंग सांगुन ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी श्री तुळजाभवानी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..