No menu items!
Thursday, August 28, 2025

अभिषेक नावले ला कांस्य पदक

Must read

बेळगावचा स्केटर अभिषेक नावले आंध्र विद्यापीठ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये चमकला. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंध्र विद्यापीठ विशाखापट्टणम आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोलर स्पोर्ट्स स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये सुमारे 600 स्केटर सहभागी झाले होते. फ्रीस्टाईल स्केटिंग मध्ये अभिषेक नवले याने इनलाइन स्पीड स्लॅलम या मध्‍ये कांस्य पदक जिंकले उमेश कलघटगी, अध्यक्ष बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन, शारीरिक प्रशिक्षक जगदिश गसती यांनी प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापक सर जगदीश एस जोडांगी, एस.व्ही.पाटील सर, पी.ई.शिक्षक के.व्ही.पाटील सर.एनआरई सोसायटीचे अध्यक्ष सी.जी.वली सचिव विजय अरगावी .सी.एस.बीदनाल सर. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन लाभत आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!