साबंरा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच उत्साहत पार पडला.
शाळेच्या सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सी.आर.सी. अधिकारी एस. वाय. कुरबर, ग्रा. पं. सदस्या शांता देसाई, एसडीएमसी उपाध्यक्षा सुनिता जत्राटी, सदस्य लक्ष्मण जोई, दीपक जाधव, अशोक लोहार, महेश जत्राटी, यल्लाप्पा हरजी, अशोक गिरमल, अनिल चौगुले, तानाजी कलखाबंकर, ज्योती चुनारी, पूजा लोहार, सविता सोनजी, रूपा गुरव, दीपा धर्मोजी, सुधा गिरमल, सुजल शिरल्याचे आणि रेश्मा हुच्ची उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाद्वारे समारंभाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका ए. ए. पाटील यांनी शाळेतील सोयी-सुविधांची माहिती देवून पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पालकांना आपल्या मुलांना पाठवण्याचे आवाहन केले. मातृभाषेतून शिक्षणाने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास चांगला होतो. त्यांची आकलन क्षमता वाढेल, यासाठी मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शाळेतील यावर्षीचा ‘आदर्श विद्यार्थी’ यल्लेश ज्योतिबा सोनजी आणि ‘आदर्श विद्यार्थीनी’ स्वाती सोमनाथ पालकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ही बक्षिसे माजी ता. पं. सदस्य सदस्य काशिनाथ धर्मोजी यांनी पुरस्कृत केली होती. शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा दिल्याबद्दल राजू गिरमल यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला. युवा समितीकडून शाळेला आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल 1996 -97 च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यी वासू पाटील, सिद्राई जाधव, संदीप चिगळी, श्रीकांत पालकर व अर्चना पाटील यांनी अभिनंदन करुन भेट वस्तू दिली. शिक्षक व्ही. एस. कंग्राळकर, आर. बी. लोहार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ए. बी. पागाद, टी. व्ही. पाटील, के. एन. हलगेकर आदीसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.