राष्ट्रीय स्पर्धेत चमकल्याबद्दल बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर व डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शर्वरी गणेश दड्डीकर हिचा शाळेतर्फे खास सत्कार करण्यात आला.
टिळकवाडीतील डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शर्वरी गणेश दड्डीकर ही स्केटिंगमध्ये तरबेज असून तिने जिल्हा व राज्यस्तरावर अनेक पदके मिळविले आहेत प्रचंड मेहनतीनंतर अलीकडेच तिने राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी नोंदवत पदक मिळविले आहे.
शर्वरीच्या या कामगिरीचे कौतुक करून तिला प्रोत्साहन देण्यासाठी डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलतर्फे तिचा नुकताच सत्कार करण्यात आला. डी. पी. शाळेच्या शाळेच्या आवारात मुख्याध्यापीका सिस्टर रोसाम्मा जोसेफ यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
याप्रसंगी सिस्टर एलमा बार्थोलोमीव, सिस्टर एल्सा सबस्तीन, पी. टी. शिक्षक सिल्व्हिया डी लिमा, शिक्षिका मोनिका आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होता. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची सदस्य असलेल्या शर्वरी हिच्या यशामुळे शाळेचाही नावलौकिक वाढल्याबद्दल तिचे पालक गणेश दड्डीकर आणि वृषाली दड्डीकर तसेच प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे डी. पी. शाळेतर्फे धन्यवाद मानण्यात आले.