चव्हाट गल्ली येथील पारंपारिक होळी उत्सवाला आज सुरुवात झाली. प्रारंभी येथील चव्हाटा देवस्थान येथे देवाला गाऱ्हाणे घालून गल्लीतून होळीचा गाडा किल्ला तलाव परिसरात घेऊन जाऊन तेथे होळीचे झाड आणण्याकरिता गल्लीतील नागरिक रवाना झाले आहेत.
किल्ला परिसरात होळीच्या झाडाचे पूजन करून तेथून झाड चव्हाट गल्लीत मिरवणुकी द्वारे आणण्यात येणार आहे आज रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत गल्लीमध्ये सर्वजण होळीचे झाड घेऊन दाखल होतील त्यानंतर उद्या धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी 11 वाजता मंदिराच्या मागे पुन्हा पारंपारिक पद्धतीने झाड उभे केले जाईल त्यानंतर या ठिकाणी धार्मिक विधी पार पडतील.
तसेच दुपारनंतर चव्हाट गल्ली येथे जत्रा पार पडेल या जत्रेला नागरिकांनी उपस्थित रहावे आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन गल्लीतील नागरिकांनी केले आहे.