शेट्टी गल्ली येथे शॉट सर्किटने एका कौलारू घराला आग लागल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत घर मालकाचे जवळपास 40 लाख रुपयांचे नुकसान झाले असून घरातील सर्व साहित्य जळून बेचिराख झाले आहे.
शेट्टी गल्ली येथील परशराम छात्रू किल्लेकर यांच्या घराला शॉर्टसर्किटने ही आग लागली आहे. सदर घर हे कौलारू असल्याने आगीने पेट घेतला. त्यावेळी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
यावेळी ही माहिती उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना मिळताच त्यांनी सुद्धा घटनास्थळी येऊन तात्काळ पाहणी केली आणि किल्लेकर कुटुंबीयांना धीर दिला. आणि नुकसान झालेल्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.