येथील अंजनेय नगर मध्ये श्री गणेश मंदिरानजीक स्थानिक नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडला.
येथील नागरिकांना समारंभ कार्यक्रम किंवा कोणताही उत्सव करण्यास सभागृहाची आवश्यकता होती. त्यामुळे येथील नागरिकांनी पाठपुरावा करून आमदार अनिल बेनके यांच्याकडे मागणी केली होती त्यामुळे त्यांच्या या विनंतीला मान देऊन ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्याकरिता आमदारांनी या ठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडला यावेळी अंजनेय नगर मधील नागरिक उपस्थित होते.