वैश्य वाणी समाज ,वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी चा वार्षिक जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या समादेवीच्या वार्षिक उत्सवाला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरात शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सात चौघडा व काकड आरती सकाळी सात ते बारा कुंकूमार्चन अकरा वाजता समादेवी मंगल कार्यालयात देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी विविध भजनी मंडळ यांचा कार्यक्रम देखील होणार आहे .दिनांक 14 फेब्रुवारी रोजी देखील पालखी प्रदक्षिणासह विविध कार्यक्रम होणार आहेत .तसेच 15 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा ते अकरा नवचंडीका होम दुपारी 12 ते 3 प्रसाद वाटप समादेवी सभागृहात होणार आहे. त्यामुळे या समादेवी वार्षिक उत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.