कन्नड सुप्रसिद्ध अभिनेते किच्चा सुदीप हे भारतीय जनता पार्टीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉ रवी पाटील यांच्या प्रचाराकरिता बेळगावला आले होते .यावेळी श्रीनगर येथून या रोड शो ला प्रारंभ झाला . त्यानंतर उत्साह पूर्ण वातावरणात निवडणूक प्रचाराच्या रोड शो ला सुरुवात झाली. यावेळी अभिनेता किच्चा सुदीप यांनी चाहतांशी संवाद साधला आणि भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार इराणा कडाडी, खासदार मंगला अंगडी,आमदार अनिल बेनके यासह भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
रुक्मिणी नगर
बेळगाव शहरातील रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीवासीयांची भेट घेऊन डॉ रवी पाटील यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या .तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कामगार आणि शेतकरी हा देशाचा कणा आहेत कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणणे हे माझे ध्येय आहे असे डॉ रवी पाटील यावेळी बोलताना म्हणाले . उत्तर भागातील कामगार आणि रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी आज प्रचारा दरम्यान दिली .यावेळी रुक्मिणीनगरातील रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला .
डॉ बी आर आंबेडकर कॉलनी
शहरातील डॉ.बी.आर.आंबेडकर कॉलनी येथील नागरिकांची भेट देऊन तेथील रहिवाशांचा पाठिंबा डॉ रवी पाटील यांनी घेतला .यावेळी बेळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक 46 चे नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांच्या नेतृत्वाखाली डॉ रवी पाटील यांनी प्रचार केला तसेच मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह प्रभाग 35 चे नगरसेवक महादेव राठोड आणि कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतयाचना केली आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छेतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर डॉ रवी पाटील यांनी राणी चेन्नम्मा हाऊसिंग सोसायटी, श्रीनगर, येथे प्रचार केला . तेथील नागरिकांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि येत्या निवडणुकीत भाजपलाच मतदान करण्याचे आश्वासन दिले.
तसेच वंटमुरी कॉलनीत आज प्रचार केला असता मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला .यावेळी त्यांना 10 मे च्या निवडणुकीत भाजप पक्षाचा मतदान करा असे आवाहन त्यांनी केले
त्यानंतर दुपारी फुलबाग गल्ली येथे कार्यकर्ते व नागरिकांची बैठक डॉ रवी पाटील यांनी घेतली .यावेळी मतदारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची माहिती दिली. आगामी काळात चांगल्या सुविधा देणार असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत भाजपला साथ देण्याची विनंती डॉ रवी पाटील यांनी केली.
उद्याचा प्रचार मार्ग
कॅम्प परिसरातील मारुती मंदिर स्वामी बेकरी जवळ
त्यानंतर संध्याकाळी कपिलेश्वर मंदिर तांगडी गल्ली रामा मिस्त्री अड्डा संभाजी गल्ली तानाजी गल्ली मल्लिकार्जुन नगर समर्थ नगर भांदुर गल्ली पाटील मळा तशिलदार गल्ली दोड्डन्नावर कॉम्प्लेक्स फुलबाग गल्ली पहिला दुसरा आणि तिसरा क्रॉस तसेच पाटील गल्ली आणि शनी मंदिर येथे प्रचार रॅलीची सांगता होणार आहे.
तर दुपारी ऑटोमोबाईल आणि सीए असोसिएशनची बैठक पार पडणार आहे.