विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये ऑटोमोबाईल उद्योग आणि चार्टर्ड अकाउंटंटची बैठक झाली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे उत्तर मतदारसंघातील उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी हातमिळवणी करण्याचे आश्वासन देऊन विकासासाठी डबल इंजिनला साथ देण्याची विनंती केली. यावेळी दक्षिण मतदारसंघातील उमेदवार आमदार अभय पाटील उपस्थित होते.
आज डॉ.रवी पाटील यांनी मुत्यानट्टी परिसरात प्रचार केला आणि भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून आणण्याची विनंती केली. महिलांनी डॉ.रवी पाटील यांचे आरती करून स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला.
तसेच त्यांनी न्यू गांधी नगर एससी मोटर्स आणि मारुती नगरमध्ये प्रचार केला.
यावेळी जनतेने डॉ. रवी पाटील यांचे जंगी स्वागत केले. डॉ. रवी पाटील यांनी 10 मे रोजी सर्वांनी न चुकता मतदान करावे आणि उत्तरेच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती केली.
स्थानिकांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा दर्शवला
बेळगावच्या गांधी नगरमध्ये आज डॉ.रवी पाटील यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला.
सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व डॉ.रवी पाटील यांना पाठिंबा दर्शविला.
सर्वांना 10 मे रोजी मतदान करून डॉ.रवी पाटील यांना निवडून देण्याचे सांगण्यात आले.
महांतेश नगरमध्ये आज निवडणूक प्रचाराला सुरुवात झालीयावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांचे जनतेच्या पाठिंब्याने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
डॉ.रवी पाटील यांनी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून स्वतःला निवडून द्यावे असे आवाहन केले.
तसेच या भागातील समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.रवी पाटील यांनी बेळगाव येथील वड्डरवाडी येथे बैठक घेतली.यावेळी जनतेने भाजपला पूर्ण पाठिंबा देत डॉ.रवी पाटील यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
तसेच यावेळी आगामी निवडणूकीकरिता बागलकोट येथील डॉ.लिंगराज चंदरगी यांनी डॉ रवी पाटील यांना भेटून आपल्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर चव्हाट गल्ली खडक गल्ली भडकल गल्ली शेट्टी गल्ली या भागात डॉक्टर रवी पाटील यांनी आपला झुंजावती प्रचार केला यावेळी या भागातील नागरिकाने आपला जाहीर पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला असल्याचे सांगितले. तसेच सर्व गल्लीतील नागरिकांनी निवडणुकी करीता डॉक्टर रवी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.