सौंदत्तीची कन्या राज्यात एसएसएलसी परीक्षेमध्ये पहिली आली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सौंदतीच्या कन्येने दहावी परीक्षेत 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविली आहे.
अनुपमा हिरेहोळी ही सौंदत्ती येथील कुमारेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने शाळेचे सौंदत्तीचे नाव उज्वल केले असल्याने तिच्यावर कौतुकाची थाप उमटत आहे.
अतिशय मेहनत करून अनुपमा हिने यश मिळवले असल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहेत आणि त्याचे वडील श्रीशैल यांचे वर्षभरापूर्वी आजाराने निधन झाले. तर तिची आई राजश्री सौंदत्ती या एका खाजगी रुग्णालयात काम करतात शिक्षणाच्या मार्गदर्शनाखाली आणि आईच्या प्रोत्साहनामुळेच तिने हे यश साध्य केल्या असल्याचे तिने यावेळी बोलताना सांगितले.