महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी,व
खानापूर विधानसभा क्षेत्रातील
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन महाराष्ट्र नव निर्माण सेनाप्रमुख श्री राज ठाकरे यांनी केले आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांनी याचा आदर करून मतदान करावे अशी विनंती मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने करण्यात आली आहे .महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय पक्षांची नेते मंडळी आपल्या पक्षांचा प्रचार करण्यासाठी बेळगाव खानापूर व सीमाभागात
प्रचारासाठी येऊन गेली या पार्श्वभूमीवर श्री राज ठाकरे यांच्या आवाहनाबद्दल मध्यवर्ती म ए समितीने आभार मानले आहेत.
राज ठाकरे यांचे मराठी माणसांना आवाहन -मराठी उमेदवारालाच मतदान करा
