नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई – जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार अवधी सोमवारी (8 मे) सायंकाळी 6 वाजता संपला आहे.कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार सभा व समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास आधी खुल्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा असेल सोमवारी सायंकाळी 6 नंतर खुलेआम प्रचार करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या कोणत्याही भागात खुलेआम प्रचार करताना आढळून आल्यास तत्काळ गुन्हे नोंदविण्याच्या सूचना त्यांनी अठरा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या. F.S.T. सर्व गुप्तचर पथकांनी दक्ष राहावे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे.